मोनिका क्षीरसागर
अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठ हे जगातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांपैकी एक मानले जाते.
या विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्या अनेक भारतीय व्यावसायिकांनी जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला आहे.
महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी हार्वर्डमधून चित्रपटसृष्टी आणि वास्तुकलेचा अभ्यास केला आणि नंतर MBA पूर्ण केला.
भारतीय-अमेरिकी चित्रपटनिर्माता मीरा नायर यांनी हार्वर्डमधून ‘Visual and Environmental Studies’ या शाखेत मास्टर्ससाठी शिष्यवृत्ती मिळवली.
रतन टाटा यांनी कॉर्नेल विद्यापीठातून आर्किटेक्चरमध्ये पदवी घेतली आणि पुढे हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या Advanced Management Program मध्ये सहभाग घेतला.
कपिल सिब्बल यांनी सेंट स्टीफन्स महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर, हार्वर्ड लॉ स्कूलमध्ये LLM करायला प्रवेश मिळवला.
सुब्रमण्यम स्वामी यांनी भारतीय सांख्यिकी संस्थेतून मास्टर्स केल्यानंतर, हार्वर्डवर Rockefeller स्कॉलरशिपने PhD पूर्ण केली.
या सर्व व्यक्तींनी हार्वर्डमधून मिळवलेल्या शिक्षणाचा वापर करून भारतासह जगभरात व्यवसाय, राजकारण आणि समाजकारणात मोठा प्रभाव निर्माण केला.