Namdev Gharal
नाचणीच्या आंबिलीबाबत अनेक गैरसमज असतात, अनेकांना ती उष्ण वाटते त्यामुळे काहीजण तिचे सेवन टाळतात
नाचणी (रागी) हे जगातील सर्वात जुन्या पिकांपैकी एक असून, तिचा उगम सुमारे ४,००० वर्षांपूर्वी पूर्व आफ्रिकेत झाला.
त्यानंतर प्राचीन काळातच (सुमारे ३,००० ते ४,००० वर्षांपूर्वी) ती आफ्रिकेतून भारतात आली व प्राचीन भारतीय संस्कृती व साहित्यात तिचा समावेश झाला
आर्युवेदानूसार याचे फायदे अनेक असतता. मुळात नाचणी आंबिल ही थंड असते शरिराला उन्हाळ्यात थंडावा देणारे हे सूपरफूड आहे
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आणि आदिवासी समुदायांमध्ये शेतकरी पिढ्यानपिढ्या शरीराला थंडावा व ऊर्जा मिळवण्यासाठी पीठ आंबवून आंबील बनवत आले आहेत.
मराठवाडा, खानदेश आणि विशेषतः कोकण-पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी वर्गाचे हे मुख्य ऊर्जापेय मानले गेले आहे.
महाराष्ट्राच्या अनेक घरामध्ये आजही हे पेय शरीराला झटपट एनर्जी देणारे, शरीरातील उष्णात कमी करणारे पेय म्हणून पिले जाते
नाचणीचे पीठ रात्रभर किंवा काही तास भिजवून फुगवले (Fermentation) जाते. यामुळे यामध्ये नैसर्गिक प्रोबायोटिक्स (Probiotics) तयार होतात, जे पचनसंस्था आणि आतड्यांचे आरोग्य उत्तम ठेवतात.
आंबिलमध्ये ताक, जिरे आणि कढीपत्ता वापरला जातो. उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून बचाव होतो आणि उष्णतेचे विकार (जसे की तोंड येणे, डिहायड्रेशन) दूर होतात.
नाचणीमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन-डी भरपूर प्रमाणात असते. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या हाडांच्या आणि दातांच्या मजबूतीसाठी आंबिल अत्यंत फायदेशीर आहे.