Raccoon | असा प्राणी जो आपले अन्न पाण्यात धुवून खातो!

Namdev Gharal

रकून (Raccoon) हा प्राणी आपले अन्न पाण्यात धुवून खातो, हे पाहताना खूप मजेशीर वाटते. पण त्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे.

रकून मूळचे उत्तर अमेरिका खंडातील आहेत. मात्र, आता ते युरोप आणि जपानमध्येही आढळतात. मुळचे जंगलातील असले तरी अन्नाच्या शोधात ते आता मानवी वस्त्यांमध्ये राहू लागले आहेत.

बऱ्याच लोकांना वाटते की रकून अन्न स्वच्छ करण्यासाठी धुतात, पण ते तसे नाही. रकूनच्या पुढच्या पंजांमध्ये अत्यंत संवेदनशील मज्जातंतू असतात. ते अन्नाला स्पर्श करून त्याबद्दल माहिती मिळवतात.

जेव्हा रकून त्याचे पंजे आणि अन्न पाण्यात भिजवतो, तेव्हा त्याच्या पंजांमधील स्पर्श करण्याची क्षमता अनेक पटींनी वाढते.

पाण्यात अन्न घोळवल्यामुळे रकूनला त्या अन्नाचा आकार, वजन आणि तापमान याची अचूक माहिती मिळते.

शास्त्रज्ञांच्या मते, रकून डोळ्यांपेक्षा त्याच्या हातांनी अन्नाला अधिक चांगल्या प्रकारे पाहतो किंवा ओळखू शकतो.

रकून हे सर्वभक्षी असतात. ते फळे, बेरीज, शेंगदाणे, कीटक, बेडूक, मासे आणि पक्ष्यांची अंडीही खातात.

जंगलात राहणारे रकून अनेकदा नदी किंवा पाण्याकाठी राहतात. ते पाण्यातून खेकडे, बेडूक किंवा इतर छोटे जीव पकडतात.

पाण्यात अन्न चोळल्यामुळे, रकूनला अन्नावरील नको असलेला कचरा किंवा खाण्यायोग्य नसलेला भाग सहज वेगळा करता येतो.

पाण्याचे अन्न धुण्याच्या या सवयीला शास्त्रिय भाषेत 'Dousing' असे म्हणतात.त्याच्या हाताचे पंजे मानसाच्या हाताप्रमाणेच कुशल असतात.

अजून एक रकूनचे वैशिष्ट्य म्हणजे त्‍यांच्या डोळ्यांभोवती काळ्या केसांचा एक पट्टा असतो, जो एखाद्या 'मास्क' किंवा चष्म्यासारखा दिसतो.

उंटाच्या कुबडामध्ये खरचं पाणी साठलेले असते का?