Namdev Gharal
कुत्रा चावल्यामुळे कुत्र्याच्या लाळेत रेबीजचे विषाणू असतात ते मानवाच्या शरिरात प्रवेश करतात यातून रेबीज होतो. यासाठी वेळेत लस घेणे खूप महत्वाचे असते.
धक्क्कादायक गोष्ट म्हणजे रेबिजमुळे(Rabies virus) होतो भारतात दरवर्षी २० हजार लोंकाचा मृत्यू होतो. सरासरी २६ मिनिटाला एका व्यक्तीचा मृत्यू होतो.
सध्या भटक्या कुत्र्यांच्या वाढलेल्या संख्येमुळे अनेक नागरिकांना जगणे मुश्किल झाले आहे.
अगदी सर्वोच्च न्यायालयानेदेखील या बाबतीत हस्तक्षेप केला आहे. दिल्लीतील भटक्या कुत्र्यांना आश्रयस्थानात ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
कुत्रा चावल्याने वेळेत लसीकरण झाले नाही तर रेबीज होतो. व त्यानंतर त्याच्यावर कोणताही इलाज नाही
रेबीज विषाणूमुळे होणारा मृत्यू हा अत्यंत वेदनादायी व भयंकर स्वरुपाचा असतो
गळ्यात आकडी, श्वास घेण्यास त्रास, गोंधळ, झोप न लागणे, असामान्य वर्तन, भ्रम, झटके, ही याची लक्षणे असतात
शेवटच्या टप्प्यामध्ये रुग्णाला हायड्रोफोबीया होतो. म्हणजे पाणी प्यायची इच्छा असते पण ते पिता येत नाही त्यामुळे तडफड होते
एवढे लोक भारतात मरतात पण त्याची सरकार दरबारी नोंद नाही कारण रेबीज झालेल्यांना उपचारच नसल्याने त्यांना घरी पाठवले जाते व त्यामुळे त्यांची नोंदच होत नाही
भारतात रेबीजची बहूतेक प्रकरणे कुत्रा चावल्यामुळे होतात, पण मांजर, वटवाघुळ, लोमडी, रॅकून इ. प्राणीही कारणीभूत ठरतात.
त्यामुळे सध्या भटक्या व पिसाळलेल्या कुंत्र्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. देशात सर्वाधिक महाराष्ट्रात Dog Bite होत असतात.