Quokka | हा आहे जगातील सर्वात आनंदी प्राणी!

Namdev Gharal

हा लहान आकार, गोल गरगरीत कान आणि चेहऱ्यावर गोड हास्य असलेला हा प्राणी आहे 'क्वोका' (Quokka)

याला जगातील 'सर्वात आनंदी प्राणी' (World's Happiest Animal) म्हणून ओळखले जाते.

याला 'आनंदी' का म्हणतात? कारण क्वोकाच्या क्वोकाच्या जबड्याची हाडांची रचना अशी असते की, तो नैसर्गिकरीत्या नेहमी हसत असल्यासारखा दिसतो.

मग तो झोपलेला असो किंवा गवत खात असो, त्याच्या चेहऱ्यावरचे स्मितहास्य कधीच कमी होत नाही.

क्वोका हा प्राणी प्रामुख्याने पश्चिम ऑस्ट्रेलियातील 'रॉटनेस्ट आयलंड' (Rottnest Island) वर आढळतो.

क्वोका माणसांना अजिबात घाबरत नाहीत. ते अतिशय जिज्ञासू आणि मैत्रीपूर्ण असतात. बेटावर त्यांचे कोणतेही नैसर्गिक शिकारी नसल्यामुळे ते निर्भयपणे फिरतात.

जगभरातील क्वोका सेल्फीची क्रेझ रॉजर फेडररपासून ते अनेक हॉलिवूड स्टार्सपर्यंत अनेकांनी 'क्वोका सेल्फी' सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

क्वोका हा प्राणी पूर्णपणे शाकाहारी असतो, ते प्रामुख्याने गवत, झाडांची पाने, फांद्या आणि फळे खाऊन जगतात.

जरी हे प्राणी मैत्रीपूर्ण असले, तरी त्यांना स्पर्श करणे किंवा मानवी अन्न खाऊ घालणे ऑस्ट्रेलियात बेकायदेशीर आहे.

त्यांच्या संरक्षणासाठी कडक नियम बनवण्यात आले आहेत कारण ही जात आता धोक्यात आहे.

Malagasy Leaf-nosed Snake | साप आहे की वाळलेली फांदी?