Namdev Gharal
चिनमध्ये एक असा तलाव आहे जो चिनचा आकाशाचा सर्वात मोठा आरसा Mirror of the Sky म्हणून प्रसिद्ध आहे.
किंगहाई तलाव (Qinghai Lake) असे याचे नाव असून. याचे पाणी इतके स्वच्छ आहे व याचा आकार प्रचंड असल्यामुळे आकाशाचे मोठे प्रतिबींब यामध्ये पडते.
या तलावाचे पाणी अत्यंत स्वच्छ, पारदर्शक आणि शांत आहे. त्यामुळे आकाशातील ढग, सूर्य, तारे व डोंगरांचे प्रतिबिंब या पाण्यावर अगदी आरशासारखे दिसते.
बहुतांश वेळी तलावाच्या पृष्ठभागावर वारा कमी असतो, त्यामुळे पाणी आरशासारखे स्थिर व स्वच्छ राहते.
हा तलाव तिबेटी पठारावर, समुद्रसपाटीपासून सुमारे ३,२०० मीटर उंचीवर आहे.
याचे क्षेत्रफळ ४,३१७ चौरस किलोमीटर असून चीनमधील सर्वात मोठा खारट आणि बंद तलाव आहे.
येथील हवा स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त असल्याने आकाश अधिक निळे व पारदर्शक व त्याचे प्रतिबिंबही अगदी स्पष्ट दिसते
हा तलाव टेक्टोनिक क्रिया व नद्यांच्या पाण्याच्या साठ्यामुळे तयार झाला आहे. अनेक नद्या या तलावात मिळतात, पण तलावाला बाहेर जाणारा प्रवाह नाही.
तलावाभोवती बर्फाच्छादित पर्वत, गवताळ मैदाने आणि वाळवंट आहेत. त्यामुळे संध्याकाळी आणि सकाळी तलावात दिसणारे रंगांचे परावर्तन (reflection) अत्यंत मनोहारी दिसते.
सूर्यप्रकाश, हंगाम आणि वाऱ्याच्या दिशेनुसार या तलावाचा रंग निळा, हिरवा, किंवा करडा असा बदलतो त्यामुळे तो "रंग बदलणारा तलाव" म्हणून प्रसिद्ध आहे.
लोक जेव्हा तलावाच्या काठावर उभे राहतात, तेव्हा त्यांना वाटते की ते आकाशात चालत आहेत — कारण पायाखालील पाणी आणि वरचे आकाश एकसारखे भासतात.
या ठिकाणी जरी मिठाचे प्रमाण जास्त असले तरी त्याचे उत्पादन घेतले जात नाही पण आजूबाजूला चाका, युसाई इत्यादी तलावातून मिठ काढले जाते.