Egyptian Plover | मगरीच्या जबड्यात शिरण्याचे धाडस दाखवणारा पक्षी

Namdev Gharal

मगर हा पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली जबड्याचा प्राणी आहे, तिच्या जबड्याची चावण्याची ताकद 3,000 ते 5,000 psi इतकी असते!

हा आफ्रिकेत नाईल नदीच्या आसपास आढळणारा एक छोटा, आकर्षक पक्षी आहे. याला इंग्रजीत “Crocodile Bird” असंही म्हणतात.

या जबड्यातून कोणी माघारी येईल याची शक्यताच नसते. पण Egyptian Plover हा छोटासा पक्षी हे धाडस दाखवतो व अन्न खाऊन परतही येतो.

मगरीच्या जबड्यात जाणे हे दृश्य कल्पनेत जरी आणलं तरी अंगावर काटा येतो. पण प्लोअर मात्र बिनधास्तपणे हे करु शकतो

निसर्गात शिकार करणाऱ्या प्राण्यावर असा विश्वास ठेवणं जवळजवळ अशक्य असतं. पण प्लोअर हा मगरीवर विश्वास ठेवतो.

वैशिष्ट्य म्हणजे कोणत्‍याही प्राणी पक्ष्यावर क्रुरपणे हल्ला करणारी मगर इजिप्शीअन प्लोअरला कसलीही इजा करत नाही.

वन्य जीवातील विश्वासाचा हा अनोखा प्रकार आहे, आणि असा विश्वास दाखवणे हे धाडसाशिवाय शक्यच नाही.

जबड्यात जाऊन हा पक्षी मगरीच्या दातांत अडकलेले मांस खातो. यामुळे मगरीच्या तोंडाची साफसफाई होते व प्लोअरला अन्नही मिळते.

त्‍यामुळे अनेक संस्कृतींमध्ये इजिप्शियन प्लोव्हरला "धैर्य, निडरता आणि सहजीवनाचं प्रतीक" म्हणून मानलं जातं.

मारवाडी घोडा