Tap Water: भारतातील असं शहर जिथं थेट नळाचं पाणी बिंधास्त पिऊ शकता

Anirudha Sankpal

ओडिशा जल निगमने (WATCO) २०१७ मध्ये 'ड्रिंक फ्रॉम टॅप' मिशन सुरू करून प्रत्येक घरात २४ तास शुद्ध पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.

या मोहिमेअंतर्गत IIT मद्रासच्या मदतीने संपूर्ण पाईप नेटवर्कचे निरीक्षण करून सर्व गळती (Leakages) थांबवण्यात आली.

भारतीय मानक IS 10500 नुसार पाण्याचे ३० गुणवत्तेच्या निकषांवर रासायनिक आणि धातू घटकांसाठी काटेकोर परीक्षण केले जाते.

नदीच्या पाण्याचे तीनदा परीक्षण केल्यानंतर ते वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये शुद्ध केले जाते आणि त्यानंतरच स्थानिक नळांपर्यंत पोहोचवले जाते.

आधुनिक 'जिओ-मॅपिंग' तंत्रज्ञानामुळे इंजिनिअर्सना रिअल-टाइममध्ये पाण्याचे प्रदूषण किंवा गुणवत्तेवर एकाच सर्व्हरवरून लक्ष ठेवणे शक्य झाले आहे.

'जल साथी' या महिला बचत गटांच्या माध्यमातून मीटर रीडिंग, पाणीपट्टी संकलन आणि पाणी बचतीबाबत जनजागृतीचे मोठे कार्य केले जात आहे.

ओडिशातील पुरी हे भारतातील पहिले असे शहर ठरले आहे, जिथे नागरिक नळाचे पाणी थेट पिण्यासाठी वापरू शकतात.

या सुविधेमुळे पुरीमधील घरांमध्ये आता 'RO' मशिनची गरज उरली नसून प्लास्टिक कचरा आणि पाण्याची नासाडी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

वर्षाला २ कोटी भाविक येणाऱ्या पुरी शहरात आता बाटलीबंद पाण्याचे अवलंबित्व संपले असून, हे मॉडेल इतर शहरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

येथे क्लिक करा