पुढारी वृत्तसेवा
आरोग्यासाठी फायदेशीर
कुरकुरीत आणि चविष्ट चिरमुरे केवळ स्नॅक्स नसून आरोग्यासाठीही अत्यंत गुणकारी आहेत.
वजन घटवण्यासाठी उत्तम
चिरमुऱ्यांमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मोठी मदत होते.
पचनशक्ती सुधारते
यात असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
ऊर्जेचा खजिना
चिरमुऱ्यांमध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात, जे शरीराला दिवसभर काम करण्यासाठी त्वरित ऊर्जा देतात.
हाडे होतात मजबूत
यात कॅल्शियम आणि पोटॅशियमचे प्रमाण चांगले असल्याने हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
रक्तदाब नियंत्रण
सोडियमचे प्रमाण कमी असल्यामुळे हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी चिरमुरे हा एक सुरक्षित पर्याय आहे.
झटपट भूक शमवते
मधल्या वेळेत लागणारी भूक भागवण्यासाठी तळलेल्या पदार्थांऐवजी मूठभर चिरमुरे खाणे केव्हाही उत्तम.
असा करा समावेश
लिंबू, कांदा आणि टोमॅटो टाकून बनवलेली चिरमुऱ्यांची भेळ पौष्टिक आणि चविष्ट लागते.