Protein Vs Creatine: प्रोटीन की क्रिएटीन... मसल्स गेनसाठी कोणते सप्लिमेंट चांगले?

Anirudha Sankpal

प्रथिने (Protein) हे शरीरासाठी आवश्यक मुख्य पोषक घटक आहेत, जे स्नायूंची दुरुस्ती, वाढ आणि सर्वांगीण आरोग्यासाठी अन्नासारखे काम करतात.

क्रिएटिन (Creatine) हे प्रामुख्याने शरीरातील ऊर्जा (ATP) वाढवण्याचे काम करते, ज्यामुळे व्यायामादरम्यान अधिक ताकद आणि स्टॅमिना मिळतो.

सोप्या भाषेत सांगायचे तर, प्रथिने हे स्नायू तयार करणारे 'बिल्डिंग ब्लॉक्स' आहेत, तर क्रिएटिन हे तुमची कामगिरी सुधारणारे 'परफॉर्मन्स बूस्टर' आहे.

व्यायामामुळे स्नायूंच्या तंतूंमध्ये होणारी झीज भरून काढण्यासाठी आणि नवीन स्नायूंच्या निर्मितीसाठी प्रथिनांचे सेवन अनिवार्य आहे.

क्रिएटिन थेट स्नायू बनवत नाही, तर ते तुम्हाला जड वजन उचलण्यास आणि अधिक रिपिटेशन्स मारण्यास मदत करते, ज्याचा परिणाम स्नायूंच्या वाढीवर होतो.

सामान्यतः वजनाच्या प्रति किलो १ ग्रॅम प्रथिने आणि दिवसाला ३ ते ५ ग्रॅम क्रिएटिन घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.

जर तुम्हाला दोघांपैकी एकाची निवड करायची असेल, तर प्रथिनांना प्राधान्य द्यावे, कारण त्याशिवाय स्नायूंची वाढ होणे अशक्य आहे.

दुध, अंडी, डाळी आणि सोया ही प्रथिनांची नैसर्गिक साधने आहेत, तर क्रिएटिन हे लाल मांस आणि माशांमध्ये अत्यल्प प्रमाणात आढळते.

फिटनेस तज्ज्ञ भावना हरचंद्राई यांच्या मते, या दोन्हींच्या भूमिका समजून घेतल्यास तुम्ही तुमच्या ध्येयानुसार योग्य आणि सुरक्षित निवड करू शकता.

येथे क्लिक करा