कर्करोग रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे..तरुणांमध्येही कर्करोगाचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत आहे..केवळ तंबाखू किंवा मद्यपानच नव्हे, तर चुकीची जीवनशैलीही कारणीभूत ठरते..तासन्तास एकाच जागी बसून राहणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते..‘जर्नल ऑफ नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’च्या संशोधनानुसार,बैठ्या जीवनशैलीमुळे कर्करोगाचा धोका वाढतो..कोलोरेक्टल (आतड्याचा), एंडोमेट्रियल (गर्भाशयाचा) आणि फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका अधिक असतो..दररोज 10 ते 12 तास बसून काम करणाऱ्यांमध्ये धोका अधिक वाढतो..नियमित हालचाल, व्यायाम आणि सक्रिय जीवनशैली अवलंबणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...