Gut Health : प्रोबायोटिक्स अन् कडधान्ये; आतड्यांच्या आरोग्यासाठी दहीही ठरते शक्तिवर्धक

Asit Banage

नियमित कडधान्यांचे सेवन आतड्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

काही अभ्यासांनुसार कडधान्ये खाणाऱ्यांमध्ये कोलन कॅन्सरचा धोका कमी आढळला आहे.

फळे, भाज्या, तंतुमय पदार्थ आणि नियमित व्यायामही कर्करोगाचा धोका कमी करण्यास महत्त्वाचे आहेत.

कुळीथ, मटकी, मूग आणि हरभरा हे चांगले पर्याय आहेत.

दही, योगर्ट आणि आंबवलेले पदार्थ प्रोबायोटिक्सचे महत्त्वाचे स्रोत आहेत.

प्रोबायोटिक्स आतड्यातील चांगल्या जीवाणूंचे संतुलन राखण्यास मदत करतात.

ताक आणि ताजे दही नियमित आहाराचा भाग बनवणे फायदेशीर ठरू शकते.

कोणत्याही आरोग्यविषयक निर्णयासाठी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...