Asit Banage
प्रियांका चोप्रा ही एक भारतीय अभिनेत्री आहे.
प्रियांकाने आजवर बॉलीवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले असून तिने आता हॉलीवूडमध्ये चांगलेच बस्तान बसवले आहे.
प्रियांका सध्या विदेशात राहूनही भारतीय परंपरेनुसार दिवाळी साजरी करीत आहे.
तिच्या इंस्टाग्राम पेजवर तिने दिवाळीचे खास फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती दिवाळीची तयारी करताना दिसत आहे.
तिने शेअर केलेल्या फोटोत घरातील सदस्य मेहंदी काढताना दिसत आहेत.
या फोटोत घरातील लहान मुले घरात दंगा मस्ती करत खेळत असल्याचे दिसत आहे.
या फोटोमध्ये मुलगी हाताने दिवाळीला लागणाऱ्या सजावटीच्या वस्तू बनवताना दिसत आहे.
प्रियांका आणि निक जोनस यांनी कुटुंबासह घरामध्ये लक्ष्मी पूजन केले असून प्रियांकाने दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.