पुढारी वृत्तसेवा
सकाळी पोट साफ होत नाही? दिवसभर अस्वस्थ वाटते?
सकाळी उठल्याबरोबर दात स्वच्छ करा आणि सर्वात आधी एक पेला थंड पाणी प्या.
नंतर एक पेला कोमट पाण्यात एक लिंबू पिळून प्यावे.
रात्री झोपताना १-२ चमचे 'सत इसबगोल' थंड पाणी किंवा दुधासोबत घ्या.
सकाळचे जेवण झाल्यावर एक छोटी हरड घेऊन तिचे बारीक तुकडे तोंडात ठेवा आणि तासभर चघळत राहा.
तासभर चघळल्यानंतर ती चावून गिळून टाकावी. ही पचनासाठी अत्यंत गुणकारी आहे.
शरीर अत्यंत थकलेले असेल, अशक्तपणा असेल किंवा खूप भूक-तहान लागली असेल तर हरड खाणे टाळा.
जर तुम्हाला अम्लपित्ताचा त्रास वाढलेला असेल, तर अशा वेळी देखील हरडीचे सेवन करू नये.
रात्री झोपताना दुधात उकळलेले एक अंजीर आणि बिया काढलेले दोन मनुके चांगले चावून खा आणि वरून दूध प्या.
पोटाचे रोग होऊ नयेत म्हणून हे साधे उपाय करून पहा आणि निरोगी राहा!