स्वालिया न. शिकलगार
सावळ्याची जणू मालिकेतील मुख्य अभिनेत्री प्राप्ती रेडकरने नवे फोटो शेअर केले आहेत
निळ्या पैठणीतील तिचे हे सुंदर फोटो पाहण्यासारखे आहेत
या फोटोंची खासियत म्हणजे हे फोटो तिचे वडील प्रवीण रेडकर यांनी क्लिक केले आहेत
तिने इन्स्टाग्राम कॅप्शनमध्ये आपल्या वडिलांनी हे फोटो काढले असल्याचे म्हटले आहे
गडद निळी साडी, खुले केस आणि अप्रमित सौंदर्य असा तिचा लूक पाहावयास मिळतो
कपाळावर चंद्रकोर टिकली, गळ्यात नाजूक हार, नाकात नथ असा शृंगार तिने केला आहे
तिच्या फोटोंवर भरभरून कॉमेंट्स येताहेत
युजरनी म्हटलंय- 'सतत तुझे ते गोड हासणे, अन मध्येच लाजुन पाहणे, अशीच रहा तू सदाफुली', 'खूप गोड.'