प्राजक्ता माळी ही एक लोकप्रिय आणि बहुगुणी मराठी अभिनेत्री, नृत्यांगना, सूत्रसंचालक आणि उद्योजिका आहे..तिने आपल्या अभिनयाने आणि मनमोहक हास्याने मराठी प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे..प्राजक्ताचा जन्म ८ ऑगस्ट १९८९ रोजी महाराष्ट्रातील पंढरपूर येथे झाला. तिचे बालपण आणि शिक्षण पुण्यात झाले..तिला लहानपणापासूनच नृत्य आणि अभिनयाची आवड होती. .जुळून येती रेशीमगाठी मालिकेत साकारलेली 'मेघना' ही भूमिका प्रचंड गाजली आणि तिला मोठी ओळख मिळाली..तिच्या उत्कृष्ट सूत्रसंचालनामुळे तिला आणखी लोकप्रियता मिळाली आहे..मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी पुन्हा एकदा तिच्या स्टायलिश लुकमुळे चर्चेत आली आहे..चमकदार रॉयल ब्लू रंगाचा लेहंग्यातील फोटो प्राजक्ताने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. .या लुकमध्ये प्राजक्ताचं सौंदर्य अधिकच खुलून आलं आहे..या फोटोला चाहत्यांनी 'काय गं ए! मखमली, साजूक तुपातली पुरणपोळी, मराठमोळ्या सौंदर्याची खाण,' अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत..तमन्ना भाटियाचा पिंपल्सवरील भन्नाट उपाय, सकाळी उठून लावते 'ही' गोष्ट!