आयुष्यातल्या सगळ्या दोऱ्या त्याच्याच हातात; प्राजक्ता माळी आणि अमृता खानविलकरने घेतलं बद्रीनाथचं पवित्र दर्शन
मोहन कारंडे
प्राजक्ता माळी आणि अमृता खानविलकरने बद्रीनाथ धामचे दर्शन घेतले.
सोशल मीडियावर दोघींनीही फोटो शेअर केले आहेत.
माझ्या आयुष्यातील पहिलं धाम… एक अनुपम आशीर्वाद..., ही यात्रा समजावून गेली की, आयुष्यातल्या सगळ्या दोऱ्या त्याच्याच हातात असतात, असे अमृताने म्हटले आहे.
बद्रीनाथचं दर्शन म्हणजे एक पवित्र संकेत आणि नव्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात, असेही अमृताने म्हटले आहे.
१२ ज्योतिर्लिंग यात्रा पुर्ण करताना आपसूकच ४ धाम दर्शनं होत गेली, याचा खूप आनंद आहे, असे प्राजक्ता माळीने सांगितले.
प्राजक्ता आणि अमृताने बद्रीनाथ मंदिराच्या समोर काढलेले फोटो शेअर केले आहेत.
बद्रीनाथ मंदिर उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात आहे. हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे आणि चार धामांपैकी एक आहे.
अलिकडेच प्राजक्ता आणि अमृता यांनी केदारनाथला भेट दिली होती.