स्वालिया न. शिकलगार
टीव्ही अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे
नुकतीच तिने तिची पहिली मकर संक्रांत साजरी केली आहे
तिने पारंपरिक लूकमध्ये एक सुंदर फोटोशूट केलं आहे
डार्क ब्राऊन रंगाच्या साडीत साजशृंगार करून तिने फोटोज क्लिक केले आहेत
तिने इन्स्टाग्रामवर हे फोटो अपलोड केले आहेत
तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय- पहिली मकरसंक्रात, पहिले वाण
डार्क ब्राऊन साडीवर भरजरी ब्लाऊज, भरगच्च दागिने आणि सुंदर मेकअपमुळे तिचा लूक अधिक खुलून दिसतो आहे
सोशल मीडियावर या फोटोंना हजारो लाईक्स आणि कॉमेंट्स मिळत आहेत