Benefits of Potatoes : फक्त भाजी नाही, सुपरफूड आहे बटाटा! जाणून घ्‍या आश्चर्यकारक फायदे

पुढारी वृत्तसेवा

आपण बटाट्याला अनेकदा वजन वाढवणारा शत्रू समजतो, पण योग्य प्रमाणात खाल्ल्यास तो ऊर्जा, फायबर आणि अनेक जीवनसत्त्वे देणारे एक उत्तम सुपरफूड ठरतो.

AI-generated image

बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवून देण्यास मदत करते.

AI-generated image

बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण उत्तम असते. यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी बटाटा हा उत्तम आहार आहे.

AI-generated image

'द जर्नल ऑफ न्यूट्रिशन'नुसार बटाट्यामध्ये आढळणारे पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

File Photo

बटाट्यामध्ये त्वचेच्या पेशींचे रक्षण करणारे व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.

AI-generated image

बटाट्यामधील व्हिटॅमिन बी6 मेंदूच्या आरोग्यासाठी आणि न्यूरोट्रांसमीटरच्या निर्मितीसाठी आवश्यक असते. यामुळे मानसिक तणाव कमी होण्‍यास मदत होते.

AI-generated image

व्हिटॅमिन सी ने समृद्ध असलेला बटाटा शरीराची प्रतिकारशक्ती वाढवून विविध संसर्गांशी लढण्यास मदत करतो.

AI-generated image

इंग्लंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ सरी मधील संशोधनानुसार, बटाटा शिजवून थंड झाल्यावर 'रेसिस्टंट स्टार्च'पोटाची चरबी कमी करण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

AI-generated image

बटाटा तळण्याऐवजी उकडलेला, भाजलेला किंवा सूपमध्ये खाल्ल्यास त्याचे सर्व पोषक घटक शरीराला मिळतात.

AI-generated image
येथे क्‍किल करा.