Porcupine : साळिंदर हा भाल्यासारखे काटे फेकतो का? खरी गोष्ट की गैरसमज!

Namdev Gharal

साळिंदर (Porcupine) या प्राणायविषयी आपल्याकडे अनेक गैरसमज आहेत. मुळात हा निशाचर प्राणी व क्वचितच मानवाच्या नजरेसं पडणारा असल्यामुळे याचे गुढं आणखी वाढते

यामध्ये साळिंदरच्या जवळ गेल्यावर त्‍याच्या पाठीवर असलेले टोकदार काटे भाल्यासारखे वेगाने फेकतो व शिकारी प्राणी किंवा माणसाला जखमी करतो अशी चर्चा नेहमी असते

पण खरी गोष्ट अशी आहे की साळिंदर कधीही लांबून कोणावरही काटे फेकत नाही; हा केवळ एक मोठा गैरसमज आहे.

साळिंदरचे काटे हे त्‍याच्या संरक्षणासाठी निसर्गाने दिलेले वरदान आहे, हे काटे त्याच्या त्वचेला अतिशय हलक्या रीतीने जोडलेले असतात, ते बाणासारखे सोडण्यासाठी शरीरात कोणतीही स्नायू यंत्रणा नसते.

साळिंदर काट्यांचा वापर कसा करतो? तर पहिल्यांदा ते धमकावते, धोका जाणवल्यास ते सर्व काटे ताठ फुगवते आणि शेपटी हलवून खडखड आवाज करत शत्रूला घाबरवण्याचा प्रयत्न करते.

उलट्या दिशेने धडक: शत्रू तरीही मागे न हटल्यास साळिंदर उलटे फिरून वेगाने शत्रूच्या दिशेने धाव घेते आणि आपले काटेरी अंग शत्रूवर आदळवते

काट्यांच्या टोकावर सूक्ष्म आकडे असतात. शत्रूच्या त्वचेला किंवा मांसाला स्पर्श होताच हे काटे त्यात घट्ट रुततात आणि साळिंदरच्या शरीरापासून तात्काळ वेगळे होतात.

अशावेळी साळिंदर अंग झटकते किंवा आक्रमक हालचाल करते, तेंव्हा काही आधीच सैल झालेले काटे निसटून लांब उडतात. त्यामुळे ते लांबून काटे फेकते असा भास होतो पण तसे प्रत्‍यक्षात घडत नाही

एका पूर्ण वाढ झालेल्या भारतीय साळींदराचे वजन साधारणपणे १० ते १८ किलोग्रॅम असते आणि शरीराची लांबी ६० ते ९० सेमी पर्यंत असते. हे उंदीर-घुशींच्या (Rodent) कुळातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे प्राणी आहेत.

पाठीवरील लांब, पोकळ आणि पांढरे-काळे पट्टे असलेले काटे १५ ते ३० सेमी काही वेळा ४० सेमी पर्यंतही लांब असतात. शेपटीजवळील काटे आखूड, जाड आणि अत्यंत तीक्ष्ण असतात.

हे पूर्णपणे शाकाहारी आणि निशाचर (रात्री फिरणारे) प्राणी आहेत. ते झाडांची मुळे, कंदमुळे, झाडांची साल, पाने आणि शेतातील पिके (बटाटे, गाजर, कांदे) खातात.

वाघ, बिबट्या, लांडगे आणि मगरी हे साळींदराची शिकार करण्याचा प्रयत्न करतात; मात्र साळींदराचे टोकदार काटे त्यांच्यासाठीही अनेकदा जीवघेणे ठरतात

उंटीणीचे दूध