Camel Milk | उंटीणीचे दूध : वाळवंटातील ‘पांढर सोनं’, जाणून घ्या या दूधाच्या खास गोष्टी!

Namdev Gharal

वाळवंट म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येते तो म्हणजे उंट हा प्राणी, वाळंवटात राहणाऱ्या लोकांसाठी हा प्राणी म्हणजे सर्वस्व, प्रवासापासून खाण्यापिण्यापर्यंत याच प्राण्यावर त्‍यांचे जीवन अवलबून असते

पण तुम्हाला आर्श्चय वाटेल उंटीणीचे दूध आता एवढे महत्‍वाचे ठरत आहे की अनेकांना यातून मोठे आर्थिक उत्‍पन मिळत आहे. आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या पोषणमूल्यांमुळे या दुधाला वाळवंटाचे पांढरे सोने म्हटले जात आहे

एक उंटीण एका दिवसात साधारणपणे ४ ते १० लिटर दूध देते. चांगल्या जातीच्या आणि अनुकूल वातावरणातील उंटीणी दिवसाला १५ ते २० लिटर पर्यंतही दूध देऊ शकतात. ?

या दूधाचे एक वैशिष्ट्ये म्हणजे याचे दही बणवने कठीण असते, यातील फॅट स्ट्रक्चर वेगळे असल्यामुळे उंटीणीच्या दुधाचे पारंपरिक पद्धतीने सहज दही बनत नाही

तसेच यात फॅटचे प्रमाण कमी असते, गाई-म्हशीच्या तुलनेत यात फॅट (चरबी) खूप कमी असते. त्‍यामुळे अनेक देशांमध्ये या दूधाची मागणी वाढत आहे

दीर्घकाळ टिकणारे: यातील अँटीमायक्रोबियल घटकांमुळे हे दूध सामान्य तापमानावरही इतर दुधापेक्षा जास्त वेळ टिकते. याचाही फायदा साठवणूकीसाठी होतो

याचा सेवनाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ऑटिझमसाठी उपयुक्त : संशोधनानुसार, यातील अँटिऑक्सिडंट्स ऑटिझमची लक्षणे कमी करण्यास साहाय्यक ठरतात.

लॅक्टोज इंटॉलरन्स असलेले लोक: ज्यांना गाई-म्हशीच्या दुधाची ॲलर्जी आहे किंवा दूध पचत नाही, त्यांच्यासाठी हा सुरक्षित पर्याय ठरतो.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे: यात व्हिटॅमिन सी गाईच्या दुधापेक्षा सुमारे ३ पट अधिक असते, तसेच अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल घटक भरपूर असतात.

मधुमेही रुग्ण: रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी नैसर्गिक इन्सुलिनयुक्त पर्याय म्हणून अनेक रुग्ण हे दूध नियमित घेतात.

त्वचा उजळवणारे साबण, क्रीम्स तसेच आयुर्वेदिक/न्यूट्रॉस्यूटिकल सप्लिमेंट्स बनवण्यासाठी कंपन्या मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात.

राजस्थान आणि गुजरातच्या कच्छ भागातील स्थानिक उंटपालक (मालधारी/रबारी समुदाय) यांच्याकडून हे ताजे दूध मिळते.

सुमारे ₹१२५ ते ₹१५० प्रति लिटर इतकी याची किंमत जाते. ऑनलाइन किंवा विशेष पुरवठादारांकडून ₹२५० ते ₹५०० प्रति लिटर दर जाऊ शकतो