पुढारी वृत्तसेवा
दाक्षिणात्य सुपरस्टार 'थलापती' विजयचा शेवटचा चित्रपट 'जन नायकन' सध्या प्रचंड चर्चेत आहे
या चित्रपटात अभिनेत्री पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार असून, 'बीस्ट' नंतर ही जोडी पुन्हा दिसेल
रिपोर्टनुसार, पूजाने या चित्रपटासाठी तब्बल ६ कोटी रुपयांचे मानधन घेतले आहे
एच. विनोथ दिग्दर्शर्शित चित्रपटाला अनिरुद्ध रविचंदर यांनी संगीत दिले आहे
हा चित्रपट एक पॉलिटिकल अॅक्शन थ्रिलर असून पूजा 'कायकल' (Kayal) हे पात्र साकारणार आहे
विजय-पूजाने यापूर्वी २०२२ मध्ये 'बीस्ट' चित्रपटात एकत्र काम केले होते
त्यांचे 'हलामिथी हबीबो' हे गाणे प्रचंड गाजले होते
यात बॉबी देओल खलनायक तर ममिता बैजू, प्रकाश राज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत