Anirudha Sankpal
'एक पांढरा केस तोडल्यावर १० पांढरे केस उगवतात' असं आपल्या घरातील अनेक मोठी माणसं सांगत असतात.
मात्र खरंच एक पांढरा केस तोडल्यावर १० पांढरे केस उगवतात का...? याबाबत डर्मेटॉलॉजिस्टचं काय मत आहे?
डर्मेटॉलॉजिस्टनुसार, पांढरा केस तोडल्यास त्याच्या जागी फक्त एकच नवीन केस उगवतो, त्याची संख्या वाढत नाही.
मानवी डोक्यावरील प्रत्येक केसाचे मूळ (Hair Follicle) स्वतंत्र असते आणि एका मुळातून एकच केस येतो.
एका मुळातील केस तोडल्याने आजूबाजूच्या केसांच्या मुळांवर किंवा त्यांच्या रंगावर कोणताही परिणाम होत नाही.
केस पांढरे होणे हे मेलॅनिन (Melanin) या रंगद्रव्याचे उत्पादन कमी झाल्यामुळे घडते.
केसांचा रंग बदलणे ही प्रक्रिया अनुवांशिकता (Genetics) आणि वाढत्या वयासारख्या अंतर्गत घटकांवर अवलंबून असते.
या नैसर्गिक प्रक्रियेवर बाहेरून केस तोडण्याचा कोणताही परिणाम होत नाही.
वारंवार पांढरा केस उपटल्यास त्या विशिष्ट केसाच्या मुळाला नुकसान पोहोचू शकते. यामुळं त्या विशिष्ट जागेवर भविष्यात केस उगवणे कायमस्वरूपी थांबण्याची शक्यता असते.