पुढारी वृत्तसेवा
थंडीत आपल्या आरोग्याची काळजी घेतो तशी उबदार स्वेटर आणि लोकरीच्या कपड्यांची काळजी घेणेही गरजेचे असते.
थंडीची चाहूल लागल्यान कपाटातून स्वेटर, जॅकेट बाहेर येतात. ते धुताना काही गोष्टींची काळजी आवश्यक असते. नाहीतर ते धुतल्यावर सैल पडू शकतात.
लोकरीचे कपडे वॉशिंग मशिनमध्ये धुणार असाल तर ते इतर कपड्यांसोबत न धुता स्वतंत्र धुवा.
लोकरीचे कपडे धुताना गरम पाण्याचा वापर करण्याऐवजी थंड पाण्याचा वापर करावा.
लोकरीचे कपडे धुताना डिटर्जंटचा वापर करण्याऐवजी वॉशिंग लिक्विडचा वापर करणे योग्य ठरते.
लोकरीचे कपडे जास्त वेळ पाण्यात भिजत ठेवल्यास ते खराब होउ शकतात. त्यामुळे धुण्याच्या काहीवेळ आधीच भिजवून काढावेत.
धुतल्यावर लोकरीचे कपडे जोर लावून पिळल्यास ते सैल होतात. त्यामुळे हालक्या हाताने पिळावेत.
लोकरीचे कपडे पाणी शोषून घेतात. त्यामुळेे दोरीवर टाकल्यास ओझ्यामुळे त्यांचा आकार बदलू शकतो. त्यामुळे सुकण्यासाठी हँगरला अडकवावेत.