Namdev Gharal
निसर्गात असे चमत्कारी जीव जंतू आहेत की ज्यांच्या विषयी विज्ञानालाही सांगता येत नाही. यातीलच एक आहे प्लॅटिपस (Platypus), हा प्राणी जगात फक्त ऑस्ट्रेलिया खंडातच आढळतो
प्लॅटिपस (Platypus) हा सर्वात विचित्र प्राणी आहे. कारण हा प्राणी असून अंडी दतो तर पिलांना दूध पाजण्यासाठी याच्याकडे स्तन नसतात तर त्याच्या त्वचेतून दूध झिरपते व तेच दूध पिले चाटून पितात
त्यामुळे याला दूध पाजणारा सस्तन प्राणी म्हणायचे की अंडी देणरा पक्षी कोणत्या वर्गात बसवायचा हा प्रश्नच अनुत्तरीत राहतो. शास्त्रज्ञ याला 'मोनोट्रीम' (Monotreme) प्रकारात ठेवतात
याला बदकासारखी चोच असते तर शरीर बीव्हरसारख्या सस्तन प्राण्यांसारखे असते तर याचे पाय उदमांजरासारखे शक्तिशाली असतात.
प्लॅटिपसच्या शरीराची आणखी एक खासियत म्हणजे त्याला जठर (Stomach) नसते. तो जे काही खातो, ते थेट त्याच्या आतड्यांमध्ये जाते. त्याच्या आहारात प्रामुख्याने कीडे, अळ्या आणि कोळंबीचा समावेश असतो.
प्लॅटिपसला दातही नसतात. खाताना तो अन्नासोबत थोडे खडे आणि वाळू तोंडात घेतो, ज्याच्या मदतीने तो अन्न भरडून काढतो.
चोचीमध्ये विशेष सेन्सर्स असतात त्यामुळे पाण्याखाली शिकार करताना प्लॅटिपस आपले डोळे, कान आणि नाक बंद ठेवतो.
सेन्सर्सच्या मदतीने सावज शोधतो. शिकारीच्या शरीरातून निघणाऱ्या विद्युत लहरी (Electrical signals) ओळखून त्याचा शोध घेतो.
नर प्लॅटिपसच्या मागच्या पायांवर विषारी नखे (Spurs) असतात. हे विष मानवासाठी जीवघेणे नसले तरी, त्यामुळे होणाऱ्या वेदना अतिशय तीव्र आणि असह्य असतात.