Namdev Gharal
आफ्रिकेजवळ असणारा मादागास्कर हा देश आपल्या भौगोलिक वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथील झाडे निसर्गातील चमत्कार आहेत.
हा देश जगापासून ८ कोटी वर्षे वेगळा राहिलेला देश आहे त्यामुळे येथील झाडेही परग्रहाची किंवा काल्पनिक जगाची आठवण करुन देतात.
दुसरे एक वैशिष्ट्ये म्हणजे येथील ८०% पेक्षा जास्त झाडे आणि प्राणी जगाच्या पाठीवर इतर कुठेही आढळत नाहीत.
मादागास्करमधील सर्वात प्रसिद्ध झाड म्हणजे 'बाओबाब'. या झाडांकडे पाहिल्यावर असे वाटते की कोणीतरी झाड उपटून उलटे लावले आहे, म्हणजेच याची मुळे हवेत आहेत आणि फांद्या जमिनीत!
या झाडांना पाण्याची टाकी म्हटले जाते कारण या झाडांचे खोड प्रचंड जाड असते, ज्यामध्ये ते हजारो लिटर पाणी साठवून ठेवलेले असते.
दूसेर झाड आहे येथील 'ऑक्टोपस ट्री' (Octopus Tree) हे झाड पूर्णपणे काट्यांनी भरलेले असते आणि त्याच्या फांद्या एखाद्या ऑक्टोपसच्या हातासारख्या वर गेलेल्या असतात.
येथे आढळणारे अजून एक झाड म्हणजे ट्रॅव्हलर्स पाम (Traveler's Palm) हे झाड अगदी एखाद्या मोठ्या पंख्यासारखे (Fan) दिसते. याला 'ट्रॅव्हलर्स पाम' म्हणतात कारण याच्या पानांच्या देठात पाणी साठलेले असते.
काही अभ्यासकांच्या मतानुसार मादागास्करला 'आठवा खंड' असेही म्हटले जाते. ही झाडे अद्वितीय असण्यामागे वैज्ञानिक कारणे आहेत
सुमारे ८८ दशलक्ष वर्षांपूर्वी मादागास्करचा भूभाग भारतीय उपखंडापासून आणि आफ्रिकेपासून वेगळा झाला. तेव्हापासून हा देश चहुबाजूंनी समुद्राने वेढलेला आहे.
इतर खंडांपासून संपर्क तुटल्यामुळे, येथील वनस्पतींनी तिथल्या विशिष्ट हवामानानुसार स्वतःला विकसित केले. यामुळे अशा प्रजाती तयार झाल्या ज्या जगातील इतर कोणत्याही वातावरणात टिकू शकत नाहीत.
तसेच येथील 'एव्हेन्यू ऑफ द बाओबाब्स' हा रस्ता जगातील सर्वात सुंदर आणि विचित्र फोटोग्राफी स्पॉट मानला जातो.