पुढारी वृत्तसेवा
प्रवासात तहान लागली की, आपण लगेच प्लॅस्टिकची पाण्याची बाटली विकत घेतो; पण कधी विचार केलाय का, की या बाटलीतलं पाणी किती दिवसांपर्यंत पिण्यायोग्य असतं?
दुकानामध्ये मिळणाऱ्या सीलबंद बाटल्यांमधील पाणी सहजासहजी खराब होत नाही. पण पाणी सुरक्षित असले तरी, ज्या बाटलीत ते साठवले आहे त्या बाटलीची गुणवत्ता वेळेनुसार बदलत जाते, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
बाटलीवरील 'Best By/Expiry' तारीख ही पाण्यासाठी नसते. ती प्लॅस्टिक बाटलीच्या गुणवत्तेसाठी असते. एका ठराविक काळानंतर प्लॅस्टिकची गुणवत्ता ढासळू लागते.
कालांतराने प्लॅस्टिकच्या बाटलीतील रसायने (उदा. Antimony, BPA) पाण्यात मिसळू लागतात. ही बाटली जास्त तापमानात किंवा थेट सूर्यप्रकाशात ठेवली, तर ही रासायनिक प्रक्रिया अधिक वेगाने होते आणि पाणी दूषित होऊ शकते.
एकदा का तुम्ही बाटलीचे सील उघडले, की हवेतील सूक्ष्म जीवाणू पाण्यात सहज प्रवेश करतात. त्यामुळे बाटली उघडल्यानंतर पाण्याचा वापर त्वरित करणे सुरक्षित ठरते.
बाजारात मिळणाऱ्या बहुतेक बाटल्या 'PET' प्रकारच्या प्लॅस्टिकपासून बनलेल्या असतात. हे प्लॅस्टिक सर्वसाधारण वापरासाठी असले तरी, दिवसेंदिवस ते पाण्यात सूक्ष्म पदार्थ (Micro-particles) सोडू शकते.
प्लॅस्टिक बाटल्या वापरण्यास सोयीस्कर असल्या तरी, त्यात पुन्हा पुन्हा पाणी भरणे किंवा वारंवार ती उघडणे टाळावे. यामुळे पाण्याची चव बदलू शकते आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो.
घडलेली पाण्याची बाटली अनेक दिवस तशीच ठेवल्यास त्यात सूक्ष्मजीवांची मोठी वाढ होऊ शकते. त्यामुळे, उघडलेली बाटली शक्यतो १ ते ३ दिवसांत वापरून संपवणे हिताचे आहे.
FSSAI च्या नियमांचे पालन करा. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या (FSSAI) सूचनेनुसार, बाटलीबंद पाणी त्यावर दिलेल्या 'Expiry Date' पर्यंतच वापरावे. मुदत संपलेल्या बाटलीतील पाणी पिणे आरोग्यास घातक ठरू शकते.