पुढारी वृत्तसेवा
आपण सुरक्षित समजून पित असलेले बाटलीबंद (Bottled Water) पाणी आरोग्यासाठी घातक ठरू शकते, असे नव्या संशोधनातून पुन्हा एकदा समोर आले आहे.
कॅनडातील कॉन्कॉर्डिया विद्यापीठातील संशोधनानुसार, नळाच्या पाण्यापेक्षा बाटलीबंद पाण्याचा वापर शरीरासाठी अधिक अपायकारक.
बाटलीबंद पाण्याचे सेवन करणाऱ्यांच्या शरीरात दरवर्षी सुमारे ९०,००० अतिरिक्त 'मायक्रोप्लास्टिक' कण जात असल्याचे संशोधनात स्पष्ट झाले.
मायक्रोप्लास्टिक म्हणजे प्लास्टिकचे असे सूक्ष्म कण, जे साध्या डोळ्यांनी पाहणे मानवी दृष्टीला अशक्य असते.
प्लास्टिक पॅकेजिंग आणि बाटल्यांमधून हे सूक्ष्म कण तुटून पाणी व अन्नात मिसळतात आणि नकळत शरीरात प्रवेश करतात.
बाटलीबंद पाण्याच्या प्रत्येक घोटागणिक हे सूक्ष्म कण शरीरात साठत राहतात, ज्याची साधी जाणीवही आपल्याला होत नाही.
शरीरात मायक्रोप्लास्टिक साठल्यास हार्मोन्सचे असंतुलन, अंतर्गत दाह आणि पेशींचे नुकसान होण्याचा तज्ज्ञ देतात.
बाटलीवर 'Pure' किंवा 'Filtered' असे लिहिलेले असले, तरी त्यातून मायक्रोप्लास्टिक पूर्णपणे नष्ट होत नसल्याचे संशोधनातून सिद्ध.
केवळ पाणीच नव्हे, तर प्लास्टिक कंटेनर, डिस्पोजेबल कप आणि प्लास्टिकच्या भांड्यांमुळेही मायक्रोप्लास्टिकचा धोका कायम.
प्लास्टिकऐवजी काच किंवा स्टेनलेस स्टीलच्या बाटल्यांचा वापर करा आणि शक्यतो गाळलेले नळाचे पाणी पिण्याला प्राधान्य द्या.