dog communication | कुत्र्यांना माणसाची भाषा कशी समजते? काय सांगते संशोधन?

पुढारी वृत्तसेवा

संशोधन सांगते की, कुत्रे केवळ शब्दांचा अर्थच नाही, तर आपल्या बोलण्याचा सूर देखील ओळखतात.

कुत्र्यांसाठी भाषा 'शब्दांची' नसते, तर ती 'ध्वनीची' (Sound) असते. तुम्ही "Sit" म्हणा किंवा "बस", त्यांना सरावाने दोन्ही समजतात.

माणसांप्रमाणेच, कुत्रे शब्दांच्या अर्थासाठी मेंदूचा डावा भाग आणि भावनांसाठी उजवा भाग वापरतात, असे हंगेरीमधील एका अभ्यासात समोर आले आहे.

कुत्रा सरासरी सुमारे १६५ शब्द किंवा त्यापेक्षा जास्त शब्द आणि मानवी खुणा लक्षात ठेवू शकतो, असे संशोधनात स्‍पष्‍ट झाले आहे.

इंग्रजीमधील "Stay", "Come", "Sit" , catch हे शब्द उच्चारायला सोपे आणि 'शार्प' (Sharp sounds) असतात, जे कुत्र्यांच्या कानांना पटकन पकडता येतात.

तुम्ही उत्साहात चुकीचा शब्द बोललात, तर कुत्रा तुमच्या उत्साहाकडे बघून प्रतिसाद देतो. त्यांच्यासाठी तुमच्या आवाजातील चढ-उतार जास्त महत्त्वाचे असतात.

'करंट बायोलॉजी'मधील संशोधनानुसार, कुत्रे मानवी आवाजातील 'पॉझ' आणि 'इमोशन' यावरून संदेशाचा अर्थ लावतात.

तुम्ही काय बोलता, यापेक्षा तुम्ही कसे उभे आहात आणि तुमच्‍या हाताच्‍या हालचाली हात काय सांगतात?, यावर कुत्र्याचे बारीक लक्ष असते.

सातत्य आणि सरावामुळे कुत्रा कोणत्याही भाषेतील विशिष्ट ध्वनीला विशिष्ट कृतीशी जोडू शकतो.

भाषा कोणतीही असो, प्रेम आणि प्रेमाचा स्वर हीच कुत्र्यांसाठी जगातील सर्वात मोठी भाषा आहे!

येथे क्‍लिक करा.