पुढारी वृत्तसेवा
पपईमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते, त्यामुळे हा रस प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही आणि ताजेतवाने वाटते.
पपई रसात भरपूर व्हिटॅमिन 'सी' असते. यामुळे शरीर आजारांशी आणि इन्फेक्शनशी अधिक चांगल्या प्रकारे लढू शकते.
पपईचा रसातील अँटीऑक्सिडंट्सचा खजिना शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतो.
या रसामधील असलेली नैसर्गिक घटक (एन्झाइम्स) अन्नातील प्रथिने पचवण्यास मदत करतात.
शरीरातील कोणत्याही प्रकारची अंतर्गत सूज कमी करण्यासाठी पपईचा रस फायदेशीर ठरतो.
या रसातल व्हिटॅमिन ए, सी आणि ईमुळे त्वचा चमकदार होते.
पपई रसामध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असते. रस प्यायल्याने पोट भरलेले वाटते आणि वजन नियंत्रणात राहते.
पपई रसातील पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
टीप : ही माहिती केवळ मार्गदर्शनासाठी असून ती इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. कोणत्याही घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.