Phyllobates terribilis |या बेडकाचे विष 20,000 उंदरांना एकाचवेळी मारु शकते

Namdev Gharal

Golden Poison Dart Frog हा असा बेडूक आहे ज्याचे विष जगातील सर्वात जहाल विषात दुसऱ्या क्रमांकावर येते, Box Jellyfish या समुद्री जीवाचे विष प्रथम क्रमांकावर येते

मुख्य म्हणजे याच्या त्‍वचेवर हे विष असते. या बेडकांना विष थेट तयार करता येत नाही, ते त्यांच्या अन्नातून (विशिष्ट मुंग्या आणि कीटकांमधून) मिळवतात.

या विषाला बॅट्रॅकोटॉक्सिन (Batrachotoxin) म्हणतात. हे एक न्यूरोटॉक्सिन आहे जे मज्जासंस्था बंद करते.

१ बेडकात सुमारे १ मिलीग्रॅम विष असते, जे २०,००० उंदरांना किंवा १०–१५ माणसांना ठार करू शकते.

बॅट्रॅकोटॉक्सिन हे इतके शक्तिशाली आहे की एक ग्रॅम विषाने सुमारे 2 लाख उंदीर ठार होतील.

या विषासाठी अजूनही कोणताही Antidote तयार झालेला नाही. हे विष मज्जातंतूंचे सिग्नल थांबवते, त्यामुळे शरीरातील स्नायू (हृदयासकट) काम करणे थांबवतात.

या बेडकाचे वैज्ञानिक नाव: Phyllobates terribilis आहे जे नावच दर्शवते की तो "भयंकर" विषारी आहे.

हा बेडूक कोलंबियाच्या वर्षावनांमध्येच (Colombian rainforests) आढळतो.

या बेडकामंध्ये तेजस्वी सोनेरी, पिवळा, हिरवट किंवा नारिंगी असे रंगअसतात, रंग खूपच तेजस्वी असतात त्‍यामुळे शिकाऱ्यांना अगोदरच इशारा दिला जातो.

आकाराने हा बेडूक फक्त ५ ते ६ सेंमी लांबीचा असतो, म्हणजेच छोटासा पण खूपच घातक

कोलंबियातील आदिवासी लोक हे विष फुंकणीच्या बाणांच्या टोकाला लावतात — त्यामुळे त्याचे नाव "dart frog" असे पडले आहे.

Pig‑tailed Macaque | झाडावरुन नारळ काढून देणारी कामगार माकडं