Namdev Gharal
थायलंड हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे तसा नारळ उत्पादनासाठी, पण येथे नारळ काढण्यासाठी कामगार म्हणून चक्क माकडांना ठेवले जाते.
प्राणी हक्क् कायद्याला पायदळी तुडूवून हा प्रकार थायलंडमध्ये सर्रास केला जातो. याबाबात अनेक PETA Asia सारख्या संस्थानी तेथील सरकारडे तक्रारी केल्या आहेत
थायलंडमध्ये विशेषतः नारळाची लागवड करणाऱ्या काही भागात माकडांचा वापर केला जातो — विशेषतः Pig‑tailed Macaque (माकड) यांना नारळ काढण्यासाठी प्रशिक्षित करतात.
एका दिवसात एक माकड अंदाजे 1600 नारळ झाडावरुन तोडू शकते, माणसाला हे शक्य नाही यामुळे या माकडांचा बेकायदेशिररित्या वापर केला जातो.
पैसे वाचवण्यासाठीही काही शेतकरी माकडे पाळतात व त्यांना नारळ काढण्यासाठी प्रशिक्षण देतात
माकडांना झाडावर कसे चढायचे, नारळ कसे काढायचे हे शिकवले जाते. त्याच्या बदल्यात माकडांना तीन वेळचे अन्न दिले जाते, दूध व इतर आमिषेही दाखवली जातात.
दोन महिन्यांपर्यंत या माकडांना प्रशिक्षण दिले जाते, त्यानंतर नारळ बागांचे मालक या माकडांना आपल्याकडे कामगार म्हणून ठेऊन घेतात
पण यामध्ये माकडांचा छळ होण्याचीही शक्यता असते या माकडांना चेनने किंवा कॉलरने बांधले जाते. माकडांना नैसर्गिक वातावरणापासून वेगळे ठेवले जाते.
थायलंड सरकारने व संबंधित संस्थांनी नारळविक्रीकरीता “माकडविना” प्रमाणपत्र किंवा “Monkey-Free” उपाययोजनाही सुरू केल्या आहेत.
काही ठिकाणी हे प्रशिक्षण व माकडांच्या नारळ काढण्याच्या कामाचे प्रदर्शन पर्यटकांसाठी आकर्षण बनले आहे.
यामुळे थायलंडच्या नारळ उद्योगावर जागतिक दबाव वाढला आहे. काही सुपरमार्केट्सनी थायलंडमधील नारळ Monkey-Free उत्पादनावर प्रश्न उपस्थित केले आहेत.