पुढारी वृत्तसेवा
‘मेंस्ट्रुअल मास्किंग’ ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल
इन्फ्लुएंसर्सच्या व्हिडिओंमुळे पीरियड ब्लड चेहऱ्यावर लावण्याची चुकीची फॅड वाढते आहे.
दावा ‘त्वचा चमकते’, ‘रेटिनॉल असतो’
काहीजण म्हणतात की पीरियड ब्लडमध्ये रेटिनॉलसारखे घटक आहेत, पण हा दावा पूर्णपणे गैरसमज आहे.
तज्ज्ञांचा स्पष्ट इशारा – हा दावा खोटा
डर्मेटॉलॉजिस्ट डॉ. दिनेश कुमार यांनी BBC मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगीतले आहे की, हा ट्रेंड धोकादायक आणि वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचा आहे.
पीरियड ब्लड स्वच्छ नसते
या रक्तात 300+ प्रोटीन, एन्झाइम, जर्म्स, योनीतील सूक्ष्मजीव आणि टाकाऊ पदार्थ असतात.
चेहऱ्यावर लावल्यास संसर्गाचा धोका
जखम, पुरळ किंवा उघड्या छिद्रांवर हे रक्त लागल्यास संक्रमण, जळजळ, लालसरपणा वाढू शकतो.
कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही
पीरियड ब्लड त्वचेला फायदा करतो असे सिद्ध करणारे कुठलेही संशोधन नाही.
PRP थेरेपी वेगळी आणि तज्ञांच्या देखरेखीखालीच
रक्ताशी संबंधित स्किन-ट्रीटमेंट्स जसे PRP फक्त हॉस्पिटलमध्ये आणि प्रशिक्षणप्राप्त डॉक्टरांमार्फतच केले जातात.
अनोख्या घरगुती ‘ट्रेंड्स’ पासून सावध राहा
चेहऱ्यावर लाळ, पीरियड ब्लड किंवा अनोळखी पदार्थ लावणे अत्यंत असुरक्षित.
त्वचेची सुरक्षित काळजी फेस वॉश, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन पुरेसे
पुरेशी झोप, पाणी आणि योग्य स्किनकेअरच त्वचा तजेलदार ठेवते ट्रेंड नव्हे.