मोनिका क्षीरसागर
इडलीसाठी तांदूळ आणि उडीद डाळीचे प्रमाण 2:1 ठेवा. (दोन भाग तांदूळ, एक भाग डाळ)
तांदूळ आणि डाळ किमान ६ तास किंवा रात्रभर वेगवेगळे भिजवा.
मिक्सरमध्ये डाळ एकदम बारीक आणि पेस्टसारखी वाटून घ्या.
तांदूळ वाटताना थोडे रवाळ ठेवा; अगदी बारीक पेस्ट करू नका.
पीठ एकत्र करून, हलक्या हाताने एकाच दिशेने ढवळून घ्या.
उबदार ठिकाणी हे पीठ 8 ते 10 तास आंबवण्यासाठी ठेवा.
इडलीच्या साच्याला तेल लावून त्यामध्ये आंबवलेले पीठ भरा.
इडली स्टँडला गरम वाफेवर 10 ते 12 मिनिटे शिजवा.
झाकण उघडून, इडल्या थंड झाल्यावर साच्यातून काढा म्हणजे त्या तुटणार नाहीत.