Peregrine Falcon | बंदुकीच्या गोळीप्रमाणे शिकार करणारा पक्षी

Namdev Gharal

जगात एक असा पक्षी आहे जो बंदुकीच्या गोळीप्रमाणे वेगात सावजावर धडकतो. काही कळायच्या आतच त्‍याचा मृत्‍यू होतो. हा पक्षी म्हणजे पेरग्रीन फाल्कन

पेरेग्रीन फाल्कन (Peregrine Falcon) चे आणखी एक वैशिष्टये म्हणजे हा जगातील सर्वात वेगवान पक्षी आहे

त्याच्या शिकारीची पद्धत एखाद्या लढाऊ विमानासारखी अचूक असते. जेव्हा हा पक्षी शिकारीसाठी आकाशातून खाली झेप घेतो (Dive), तेव्हा त्याचा वेग ताशी ३२० ते ३९० किमी पर्यंत पोहोचू शकतो

बंदुकीच्या गोळीसारखा वेग , हा पक्षी एखाद्या बंदुकीच्या गोळीप्रमाणे (Bullet Speed) वेगाने खाली येतो. याला वैज्ञानिक भाषेत 'सूप (Stoop)' असे म्हणतात

शिकार करताना तो थेट धडक देत नाही, तर तो आपल्या पंजांची मुठ करून शिकारीच्या पाठीवर किंवा पंखांवर जोरदार प्रहार करतो

त्याच्या शिकारीचा वेग इतका असतो की, एका धडकेत शिकार (पक्षी) हवेतच बेशुद्ध होते किंवा लगेच मृत्यू पावते. या धडकेची ताकद एखाद्या मोठ्या अपघाताइतकी असू शकते

इतक्या प्रचंड वेगात असतानाही, हा पक्षी हवेत कुठेही वळू शकतो आणि स्वतःचे शरीर नियंत्रित करू शकतो, जे मानवी तंत्रज्ञानासाठीही एक आव्हान आहे

इतक्या वेगवान झेपेत श्वास घेताना त्याच्या फुफ्फुसांना त्रास होऊ नये म्हणून त्याच्या नाकामध्ये एक खास 'बोन ट्युबरकल' (Bone Tubercle) रचना असते, जी हवा शोषण्यास मदत करते

पेरेग्रीन फाल्कन प्रामुख्याने हवेत उडणाऱ्या इतर पक्ष्यांची (उदा. कबूतर, बदक) शिकार करतो. तो जमिनीवरील शिकाऱ्यापेक्षा हवेतील शिकारी म्हणून ओळखला जातो

या पक्षाची दृष्टी माणसाच्या तुलनेत ८ पटीने अधिक तीक्ष्ण असते. कित्येक किलोमीटर उंचावरून तो आपल्या शिकारीचा मागोवा घेऊ शकतो

काळा मटका की लाल मटका?