Clay pot | काळा मटका की लाल मटका? कोणत्‍या मटक्यातील थंड पाणी फायदेशीर

Namdev Gharal

सध्या उन्हाच्या झळांमुळे सर्वांनाच थंड पाणी गरजेचे असते. पण आरोग्याच्या दृष्टीने फ्रिजमधील पाणी हानीकारक ठरते. यामुळे अनेकजण मटक्यातील पाण्याला पंसती देतात

पण मटका खरेदी करताना हा प्रश्न पडतो की लाल मटका की काळा मटका घेणे योग्य. दोन्ही मटक्यातील फरक समजून घेवू

लाल मटका हा सामान्य मातीपासून बनवले जाते व याला भट्टीमध्ये भाजून तयार केले जाते.

या मटक्यात लोहाचे प्रमाण चांगले असते त्‍यामुळे लोहाची कमतरता असणाऱ्या लोकांना या मटक्यातील पाणी खूप फायदेशीर ठरते

तसेच लाल मटक्यात पाणी लवकर थंड होते. त्‍यामुळे पाणी ओतल्यानंतर खूप वेळ वाट पहावी लागत नाही

दुसरीकडे काळा मटका तयार करण्याची प्रक्रिया खूपच वेगळी असते ही वेळखाऊ असते

यासाठी खास प्रक्रियेतून राख व धुरापासून याला बनवले जाते. याचा फायदा म्हणजे या पाण्यात बॅक्टेरिया तयार होत नाहीत

गॅस व ॲसिडीटीची त्रास असणाऱ्यांसाठी काळ्या मडक्यातील पाणी खूपच फायदेशीर ठरते. याचा पीएच ८ पॉईंट असतो

तसेच लाल मटक्याच्या तुलनेत काळा मटका हा पाणी खूप वेळ थंड ठेवतो यामुळे खूप वेळासाठी पाणी पिण्यासाठी वापरता येते

यामुळे एकूणच पाहता लाल मटक्यापेक्षा काळ्या मटक्याचे अनेक फायदे असल्याचे दिसून येते

अननसाचे फायदे