Pineapple side Effects | 'ही' लक्षणे असलेल्या लोकांनी अननस अजिबात खाऊ नये

अविनाश सुतार

अननसमध्ये ब्रोमेलिन (Bromelain) नावाचे एन्झाइम असते, जे प्रथिनांचे विघटन करते आणि सूज कमी करण्यासाठी व औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते

ब्रोमेलिन पचनास मदत करू शकते आणि सूज कमी करू शकते, परंतु काही लोकांमध्ये ते अ‍ॅलर्जन म्हणून कार्य करू शकते

ज्यांना अ‍ॅलर्जिक रायनायटिस, दमा, अ‍ॅटोपिक डर्माटायटिस किंवा अन्नाची अ‍ॅलर्जी आहे, त्यांनी अननस खाण्यापूर्वी सावधगिरी बाळगावी

जास्त प्रमाणात अननस खाल्ल्याने रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो अननसातील पोटॅशियम मुळे शरीरातील द्रव संतुलन बदलू शकते आणि ब्रोमेलिन काही औषधांशी परस्परसंवाद करू शकते

अननसमध्ये नैसर्गिकरित्या साखरेचे प्रमाण (मुख्यतः फ्रक्टोज) जास्त असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते

अननसाची आम्लीय (acidic) प्रकृती आणि ब्रोमेलिन एन्झाइम तोंडाच्या आतील भागास त्रास देऊ शकतात

ज्यांना हिरड्यांची सूज, तोंडात जखमा किंवा दातांची संवेदनशीलता आहे त्यांना अननस खाल्ल्याने त्रास होऊ शकतो

गॅस्ट्रायटिस, अल्सर किंवा ऍसिडिटी (अ‍ॅसिड रिफ्लक्स) असलेल्या लोकांना त्रास होऊ शकतो

काही लोकांना शरीराची उष्णता वाढण्याची प्रवृत्ती असते. अननसाचे थर्मोजेनिक गुणधर्म अशा लोकांमध्ये उष्णता वाढवू शकते

येथे क्लिक करा