Lion Roar : सिंहाची गर्जना किती किलोमीटर अंतरापर्यत ऐकू येऊ शकते

अविनाश सुतार

सिंह हे प्राणी कमी फुफ्फुसदाबात अधिक जोरात डरकाळी फोडू शकतात

सिंहाच्या स्वरपटलांची ऊतके मऊ असून ती कोलेजन, इलास्टिन, स्नेहक आणि चरबी यांनी बनलेली असतात

बहुतेक प्रजातींमध्ये स्वरपटल त्रिकोणी आकाराची असतात आणि ती प्राण्याच्या श्वासनलिकेत पुढे आलेली असतात

सिंहाच्या स्वरपटलचा बाहेर आलेल्या भागांचा आकार चौकोनी आणि सपाट असतो

सिंहाच्या स्वरपटलांतील ताकदही त्यांच्या डरकाळीला मदत करते. हवा त्यांच्यातून जात असताना आणि स्वरपटल कंपन होत असताना, ऊतके ताण आणि तुटण्याचा दबाव सहन करू शकतात

सिंहाच्या गर्जनेचा आवाज ११४ डेसिबलपर्यंत जाऊ शकतो, तो मैदानावर ५ मैल (सुमारे 8 किलोमीटर) दूरपर्यंत ऐकू येतो

सिंहाच्या गर्जनेचा आवाज दाट जंगलात ३ किलोमीटर अंतरापर्यंत जाऊ शकतो. हे गॅसवर चालणाऱ्या लॉन मोअरपेक्षा सुमारे २५ पट अधिक जोरात असते

सिंहाची गर्जना साधारणपणे ६० सेकंदांपर्यंत ऐकू येते, त्यात कमी फ्रिक्वेन्सीचा आवाज असतो

सिंह आपल्या प्रदेशावर वर्चस्व राखण्यासाठी आणि इतर सिंहांना किंवा प्राण्यांना आपल्या हद्दीची जाणीव करून देण्यासाठी आणि सिंहिणींशी संपर्क साधण्यासाठी गर्जना करत असतो

येथे क्लिक करा