गर्भवती महिलागर्भधारणेदरम्यान पपई खाल्ल्याने धोका संभवतो, त्यामुळे सुरक्षित गर्भधारणेसाठी गर्भवतींनी पपई मर्यादित प्रमाणात किंवा पूर्णपणे टाळणे अत्यावश्यक आहे.अनियमित हृदयस्पंदन (Irregular Heartbeat)ज्यांना हृदयाची ठोके अनियमित होण्याचा त्रास आहे त्यांनी पपईचे सेवन मर्यादित ठेवावे .पपईमध्ये सायनोजेनिक ग्लायकोसाइड्स असतात जे पचनसंस्थेत हायड्रोजन सायनाईड तयार करू शकतात .काही प्रकारच्या अॅलर्जीअॅलर्जी असलेल्या लोकांनी पपई खाताना काळजी घेणे आवश्यक आहे .पपईमुळे क्रॉस-रिअॅक्टिव्हिटी होऊ शकते, ज्यामुळे शिंक, श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांतून पाणी येणे अशी अॅलर्जीक लक्षणे दिसू शकतात .मूत्रपिंडात खडे (Kidney Stones)ज्यांना मूत्रपिंडात खडे होण्याची प्रवृत्ती आहे त्यांनी पपईचे सेवन मर्यादित करावे .पपईत व्हिटॅमिन Cचे प्रमाण जास्त असते. त्याचे जास्त सेवन केल्यास कॅल्शियम ऑक्सलेट स्टोनचा धोका वाढतो .पोटाचे त्रास (Stomach Issues)पोटाच्या समस्या असलेल्या लोकांनी पपई खाण्यापासून सावध राहावे .पपईतील फायबर आणि पपेन या घटकांमुळे अॅसिडिटी, अल्सर किंवा आयबीएस सारख्या तक्रारी वाढू शकतात .येथे क्लिक करा