Brinjal Health Risks | आरोग्याची 'ही' ९ लक्षणे असलेल्या लोकांनी वांगी खाणे टाळावीत

अविनाश सुतार

वांगी हे नाइटशेड कुलातील आहे. अ‍ॅलर्जी असणाऱ्या लोकांमध्ये वांगी खाल्ल्यानंतर त्वचेवर पुरळ, डोकेदुखी किंवा पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो

वांग्यात ऑक्सलेट (Oxalate) नावाचे नैसर्गिक संयुग असते, जे काही लोकांमध्ये किडनी स्टोनची शक्यता वाढवू शकते. ऑक्सलेट्स किडनी स्टोन तयार होण्यास कारणीभूत ठरतात

वांगी फायबरने समृद्ध आहे, पचन आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते. पण काही लोकांना वांगी खाल्ल्यानंतर पोटफुगी, पोटदुखी किंवा जुलाब होऊ शकतात

वांग्यात थोड्या प्रमाणात टायरामिन (Tyramine) असते. हे संयुग MAOI प्रकारच्या अँटीडिप्रेसंट औषधांशी प्रतिक्रिया देऊ शकते आणि रक्तदाब धोकादायकरीत्या वाढवू शकते

वांग्याच्या सालीत नॅसुनिन नावाचा अँटिऑक्सिडंट घटक असतो, जो लोहाशी बंध तयार करतो. त्यामुळे ज्यांना लोहतुटीचा त्रास आहे, त्यांना वांगी हानिकारक ठरू शकते

वांगी गर्भाशयातील आकुंचन किंवा मासिक पाळीला उत्तेजन देऊ शकते. त्यामुळे गर्भवतींनी माफक प्रमाणात वांगी खावी

वांगी हे हिस्टामिन-रिलीज करणारे अन्न म्हणून ओळखले जाते. त्यामुळे अशा लोकांना डोकेदुखी, त्वचेवर पुरळ, नाक बंद होणे किंवा पचनाचा त्रास जाणवू शकतो

नाइटशेड कुलातील वांग्याची भाजी आहे. त्यामुळे सूज वाढवतात. काही लोकांना ही भाजी बंद केल्यावर वेदना कमी झाल्याचे जाणवते. त्यामुळे संधिवात असलेल्या लोकांनी वांगी टाळून पाहणे उपयुक्त ठरते

वांगी रक्तदाब कमी करण्यात मदत करू शकते. पण ज्यांचा रक्तदाब आधीच कमी आहे, अशा लोकांना वांगी खाल्ल्यानंतर थकवा, गरगरणे, अशक्तपणा जाणवतो

येथे क्लिक करा