Namdev Gharal
pelican पेलिकन हा पक्षी त्याची लांब चोच व चोचीखाली असणाऱ्या पिशवीमुळे खूपच आकर्षक व वेगळा दिसतो
याची चोच १६ इंच लाबींची असते व या चोचीच्या खाली एक ताणनारी थैली असते. ही थैली तो मासे पकडण्यासाठी वापरतो
या थैलीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ३ ते १३ लिटर पाणी किंवा मासे साठवले जाऊ शकतात.
ही थैली elastin नावाच्या लवचिक ऊतींपासून बनलेली असते व मासे पकडण्यासाठी एखाद्या जाळ्यासारखा या थैलीचा उपयोग हा पक्षी करतो.
मासे पकडल्यानंतर, पेलिकन आपले डोके वाकवून पाणी खाली ओततो आणि मासा गिळतो
गरम हवामानात थैली फडफडवून उष्णता कमी करणे यासाठीही याचा उपयोग पेलिकन करत असतात
हा पक्षी खुपच उत्सूकता असणार पक्षी असतो. त्यामुळे तो प्रत्येक गोष्टीवर चोचीने हल्ला करण्याचा प्रयत्न करतो
Zoo मधील पाळलेल्या पेलीकन पक्षाला वेळेत काही खायला मिळाले नाही तर तो दिसणारी कोणतीही गोष्ट खाण्याचा प्रयत्न करतो.
हा पक्षी आकाराने मोठा असून याची उंची 4 ते 6 फूट पर्यंत असते तर पंखांची लांबी: 2.5 ते 3.5 मीटर पर्यंत असते व वजन सुमारे 5 ते 15 किलो असू शकते.
याचे वैशिष्ट्य म्हणजे बोजड व आकाराने मोठा असूनही पेलिकन पक्षी उडू शकतो आणि त्याला पाण्यावर तरंगताही येतो.
काही वेळा अनेक पेलिकन एकत्र येऊन माशांना घाबरवून एका ठिकाणी गोळा करून त्यांना सहज पकडतात.
पेलिकनच्या ८ प्रमुख प्रजाती आहेत, त्यापैकी अमेरीकन व्हाईट पेलीकन, ब्राऊन पेलीकन, डालमिशन पेलीकन, ग्रेट व्हाईट पॅलीकन, ऑस्ट्रिलीयन पेलिकन या प्रमुख आहेत.