Namdev Gharal
अँडियन कोंडोर याची खासीयत म्हणजे आकाराने अतिशय मोठा असून तो हवेत ऊडू शकतो
आपल्याकडील गिधाड प्रजातीमधील हा पक्षी असून आकाराने विशाल असतो
हे पक्षी सर्वाधिक म्हणजे 5500 मिटर उंचीवर हे ऊडू शकतात (कोणताही पक्षी एवढ्या उंचीवर झेप घेऊ शकत नाही)
हा पक्षी प्रामुख्याने पेरू, चिली, बोलिव्हिया, इक्वेडोर, अर्जेंटिना आणि कोलंबिया या देशांतील उंच पर्वतीय भागांत आढळतो
याची उंची १.५ मिटर पर्यंत असते पंखाची लांबी साधारण २.७ ते ३.३ मीटर (जगातील सर्वात अधिक)
उंचावरच्या थंड हवामानात उडण्यासाठी त्याच्या पंखांचा मोठा विस्तार उपयुक्त ठरतो.
नराचे वजन ११ ते १५ किलो तर मादीचे वजन ८ ते ११ किलो असते
या पक्ष्याचे आयुष्यही जास्त असून साधारण पणे हे ५० वर्षे जगतात
हा मांसाहारी असून मृत प्राण्यांचे मांस (शवभक्षक) खातो.
हे पक्षी साधारणपणे ५-६ वर्षांनी एकदा प्रजनन करतात. मादी एकाचवेळी एकच अंडे घालते