Peacock Feather Remedies | मोराचे पिस देते शुभ संकेत आणि negativity करते दूर

अंजली राऊत

धार्मिकतेसह ज्योतिषशास्त्रातही महत्व

मोराच्या पंखाला धार्मिकच महत्व नाही तर ज्योतिषशास्त्रातही अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे मानले जाते की, ज्या घरात मोराची असतात, त्या घरात अशुभ होत नाही

वास्तु दोष दूर होतात

वास्तुशास्त्रानुसार मोराचे पंख घरात ठेवल्याने सर्व प्रकारचे वास्तु दोष दूर होतात आणि त्याच्या शुभ प्रभावामुळे घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही. मोराच्या पंखामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते.

माता लक्ष्मीला मोराची पिसे प्रिय

भगवान श्रीकृष्णाप्रमाणेच माता लक्ष्मीला मोराची पिसे खूप प्रिय आहेत. असे मानले जाते की, मोराची पिसे ठेवून त्याचे पूजन केल्याने धनाची देवी प्रसन्न होते आणि घर धनधान्याने ओतप्रोत भरलेले असते

वैवाहिक जीवनात गोडवा

जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या वैवाहिक जीवनात देखील मोराच्या पिसांचा उपाय फायदेशीर ठरू शकतो. वैवाहिक जीवनात गोडवा आणण्यासाठी बेडरूममध्ये बासरीसह मोराची पिसे ठेवा. हा उपाय केल्याने तुम्हाला चमत्कारिक बदल अनुभवास मिळतील.

पैशाची कमतरता भासणार नाही

जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात पैसा टिकत नाही आणि तो लवकर खर्च होतो, तर पैशाचा साठा भरलेला ठेवण्यासाठी घराच्या दक्षिण दिशेला एक कॅश बॉक्स ठेवा आणि त्यात मोराचे पिस ठेवा. वास्तूचे हे उपाय केल्याने तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही.

मुलांवर वाईट नजर पाडणार नाही

जर तुम्हाला असे वाटत असेल की, तुमच्या मुलावर वारंवार कोणाची तरी वाईट नजर पडते, तर हे टाळण्यासाठी तुम्ही चांदीचे एक ताबीज करुन त्यामध्य मोराचे पंख घालून ते घालाव, या उपायाने असे दोष दूर होतील.

शास्त्रीय पुरावा नाही

येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या असलेल्या श्रद्धेवर आधारित आहे, त्यास कोणताही शास्त्रीय पुरावा उपलब्ध नाही

White Hair Home Remedies : केस झालेत पांढरे? घरच्या घरी करा काळे, तेही सहजपणे.. | Pudhari Photo
White Hair Home Remedies : केस झालेत पांढरे? घरच्या घरी करा काळे, तेही सहजपणे..