पुढारी वृत्तसेवा
शांत झोप हे केवळ शरीराचे विश्रामस्थान नाही, तर ते सुदृढ आरोग्य आणि आनंदी मनाचे गुपित आहे. जाणून घेवूया दररोज गाढ झोपेसाठीच्य सोप्या सात टिप्स.
सुट्टी असो किंवा कामाचा दिवस, रोज एकाच ठराविक वेळी झोपण्याची आणि सकाळी उठण्याची सवय लावा.
झोपण्यापूर्वी मन शांत ठेवण्यासाठी वाचन किंवा ध्यान करा. यामुळे शरीराला झोपण्याची वेळ झाल्याचा संकेत मिळतो.
तुमची खोली शांत, अंधारी आणि थोडी थंड असेल याची काळजी घ्या, जेणेकरून झोप चांगली लागेल.
झोपण्याच्या १ तास आधी मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉप वापरणे बंद करा, कारण त्यातील प्रकाश झोप घालवतो.
शारीरिक हालचालींमुळे झोप उत्तम लागते, पण झोपण्याच्या अगदी आधी खूप जड व्यायाम करणे टाळा.
रात्री उशिरा जड जेवण करू नका. तसेच झोपण्यापूर्वी चहा, कॉफी किंवा मद्यपान करणे टाळा.
शरीर आणि मन रिलॅक्स करण्यासाठी दीर्घ श्वास घेणे किंवा स्नायू शिथिल करण्याच्या तंत्रांचा वापर करा.