Butchar Bird : पक्षी जगतातील ‘कसाई‘

Namdev Gharal

हा पक्षी एखाद्या कसायाप्रमाणे शिकारीचे तुकडे करतो व साठवून ठेवतो

याचे नाव आहे बुचर बर्ड ( Butchar Bird ) पण याचे मुळ नाव श्राइक (Shrike) पण शिकारीच्या पद्धतीमुळे त्‍याला हे इंग्रजी टोपणनाव आहे.

हा पक्षी केलेली शिकार झाडांच्या टोकदार काट्यांना नेऊन अडकवतो व फाडून खातो

याचे कारण म्‍हणजे या पक्ष्याचे पंजे कमजोर असतात त्‍यामुळे त्‍याला थेट शिकार फाडता येत नाही

पण याची चोच गरुडासारखी वाकडी व टोकदार असते याने तो काट्यात अडकलेल्‍या शिकारीचे तुकडे करतो

त्‍यामुळे केलेली शिकार एखाद्या काट्याला किंवा तारेला अडकवतो व नंतर आरामात त्‍याचा फडशा पाडतो

याचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे भूक नसताना शिकार सापडली तरी ती नेऊन ती काट्यावर अडकवतो व नंतर ती खातो

शिकार कुठे अडवली आहे हे त्‍याच्या महिनों महिने लक्षात राहते.हिवाळ्यात शिकारीची कमी असते त्‍यावेळी ती त्‍याच्या उपयोगाला येते

याचे वास्‍तव्य प्रामुख्याने मोकळी कुरणे, शेतं, रानटी गवत अशा ठिकाणी असते

उंदीर, पाली, किटक, छोटे साप याची प्रामुख्याने हा बुचर पक्षी शिकार करतो. भारतात याच्या ग्रेट ग्रे श्राइकआणि बे ब्राउन श्राइक या दोन प्रजाती आढळतात

जगातील सर्वात मोठा पक्षी