Namdev Gharal
लंडनमधील काही झाडे सध्या चर्चेत आली आहेत. कारण रात्रीच्या वेळी दुरुन पाहिल्यावर ही हिरव्यागार पानांनी लगडलेली झाडे वाटतात
पण रात्रीच्यावेळी ही चमकनारी पाने पाहून झाडाजवळ गेल्यास वेगळीच गोष्ट समोर येते. ही पाने नसून विश्रांती घेत असलेले शेकडो पोपट असतात
लंडनच्या काही भागात, गुलाबी चोची असलेले पोपटांचे मोठे गट दररोज संध्याकाळी जमतात आणि सामान्य झाडांना जिवंत हिरव्या चमकाऱ्या झाडांमध्ये बदलून टाकतात
सूर्यास्तानंतर हे पोपट विश्रांतीसाठी एकत्र जमतात एका एका झाडावर जवळजवळ १ हजारच्या संख्येने एकाच वेळी बसतात.
संशोधकांनी केलेल्या अध्ययनात हे पोपट मुळचे मूळचे दक्षिण आशिया आणि आफ्रिकेतील असल्याचे आढळून आले आहे
आता ते स्थलांतर होऊन लंडनमध्येच वास्तव्य करु लागले आहेत. त्यांनी शहरी जीवनाशी जुळवून घेतले आहेत
हे पोपट आता लंडनच्या उद्याने आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. हे सुंदर आहेत, परंतु वाढणाऱ्या संख्येने स्थानिक रहिवाशांसह संशोधकही आश्चर्यचकित होत आहेत.