Cutest Bird |भेटा जगातील सर्वात गोंडस पक्ष्याला : पक्षी आहे की कापसाचा गोळा!

Namdev Gharal

हा जपानच्या होक्काइडो बेटावर आढळणारा हा एक पक्षी आहे याठिकाणी आळणारा या पक्ष्याच्या प्रजातीचा चेहरा पूर्णपणे पांढरा असतो

त्‍यामुळे याला जपानमधील बर्फातील परी असे टोपन नाव आहे (Japanese Snow Fairy) हा जगातील सर्वात गोंडस पक्षी मानला जातो (Cutest Bird)

याला तांत्रिक भाषेत 'Shima Enaga' (शिमा एनागा) असे म्हणतात. तर याचे अधिकृत नाव Long-tailed Tit असे आहे

हा पक्षी खूप लहान आणि गोलमटोल असतो. थंडीत स्वतःला उबदार ठेवण्यासाठी तो आपले पंख फुगवतो, ज्यामुळे तो एखाद्या पांढऱ्याशुभ्र कापसाच्या गोळ्यासारखा दिसतो.

त्याच्या पांढऱ्या चेहऱ्यावर दोन लहान काळे ठिपके म्हणजे त्याचे डोळे आणि एक छोटी चोच असते, ज्यामुळे तो एखाद्या 'टेडी बेअर'सारखा किंवा 'इमोजी'सारखा दिसतो.

जपानमध्ये या पक्षाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. तिथे याच्या आकाराचे पदार्थ (उदा. डोनट्स, केक) आणि खेळणीही बनवली जातात.

हे पक्षी प्रामुख्याने जपानमधील होक्काइडो (Hokkaido) बेटावर आढळतात.

हा पक्षी खूपच लहान असतो (साधारण १३-१५ सेंमी), ज्यामध्ये अर्ध्याहून अधिक लांबी त्याच्या शेपटीची असते.

हे पक्षी खूप चपळ असतात आणि समूहाने (थव्याने) राहणे पसंत करतात. हे पक्षी कोळ्याचे जाळे, शेवाळ आणि पिसे वापरून अतिशय लवचिक घरटे विणतात.

Symphony of Stones