Parenting tips : मुलांसमोर आई-बाबांचं भांडण? त्यांच्या मनावर होऊ शकतो 'हा' गंभीर परिणाम

पुढारी वृत्तसेवा

तुमच्या घरात नेहमी लहान-सहान गोष्टींवरून कडाक्याची भांडणं किंवा उग्र वाद होत असतात का?

Parents Fighting Affect on Child | Pudhari Photo

पालकांमधील रोजचे वाद मुलांसाठी अत्यंत वेदनादायी असतात; यामुळे त्यांच्या कोवळ्या मनावर तीव्र मानसिक तणाव निर्माण होतो.

सततच्या घरगुती कलहामुळे मुलांची घर आणि कुटुंबाबद्दलची सुरक्षिततेची भावना संपून ते स्वतःला असुरक्षित मानू लागतात.

भावनिक अस्थिरता (Emotional Trauma)

अशा अशांत वातावरणात राहणारी मुलं लहान वयातच नैराश्य (Depression), चिंता (Anxiety) आणि एकाकीपणाची बळी ठरतात.

Child Care | file photo

चिडचिडेपणा आणि उग्र वर्तन

मुले पालकांच्या वागण्याचे अनुकरण करतात. घरात वाद पाहिल्यामुळे ती देखील स्वतः चिडचिडी, हट्टी आणि हिंसक बनू लागतात.

child psychology

अभ्यासावर विपरित परिणाम

घरातील सततच्या तणावामुळे मुलांची एकाग्रता खालावते, ज्यामुळे त्यांच्या शालेय कामगिरीवर आणि बौद्धिक प्रगतीवर वाईट परिणाम होतो.

study tips to avoid sleep | Canva

भविष्यातील नात्यांची भीती

लहानपणी पाहिलेला हा संघर्ष मनात घर करतो, ज्यामुळे मोठे झाल्यावर कोणावरही विश्वास ठेवण्यात आणि निरोगी नाती निर्माण करण्यात त्यांना अडचणी येतात.

पालकांनो हे लक्षात घ्या

मुलांचे संगोपन म्हणजे केवळ अन्न-वस्त्र देणे नव्हे, तर त्यांना घरात एक शांत, सुरक्षित आणि प्रेमळ वातावरण देणे ही देखील तुमचीच जबाबदारी आहे.

Parenting Coach | Pudhari
येथे क्लिक करा...