मुलांना शिस्त लावायची आहे? मग या टिप्स फॉलो करा...
पुढारी वृत्तसेवा
मुलांना आनंदी भविष्य देण्यासाठी, त्यांना वर्तमानात शिस्त शिकवणे खूप महत्वाचे आहे.
बेशिस्त मुलांना पालक अनेकवेळा आरोडाओरडा किंवा शारीरिक शिक्षा देवून शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात.
मुलांचे संगोपन आणि त्यांना शिस्त लावणे हे पालकांसमोरील मोठे आव्हानच असते.
मुलांना शिस्त शिकवण्यापूर्वी त्यांच्या दृष्टिकोनातून परिस्थितीचा विचार करा.
मुलांवर ओरडु नका. त्यांना जवळ घेवून डोळ्यात पाहून तुमचा मुद्दा स्पष्टपणे सांगा.
मुलांवर भीती दाखवून शिस्त लावल्याने मुले खोटे बोलायला आणि गोष्टी लपवायला शिकतात.
मुलांचे म्हणणे शांतपणे ऐकूण घ्या. त्यांच्याशी संवाद वाढवा.
मुलांना शिस्त लावताना तुमच्या भावनांवरही नियंत्रण ठेवा.
मुले तुमचे ऐकत नसतील तर त्यांना आवडणार्या सुविधांपासून वंचित ठेवा.
मुलांच्या हट्टीपणाला शरण जाऊ नका. मुलापासून दूर जा आणि तुमचे मन शांत केल्यानंतर पुन्हा प्रयत्न करा.
तुम्हाला पाहूनच मुले शिकतात. पालक म्हणून तुम्ही शिस्त पाळा
शिस्तीचे पालन केले की, मुलांचे काैतुक करा.
येथे क्लिक करा.