Namdev Gharal
पॅरासिटीमॉल ही एक सामान्य व सहज मिळणारी पेनकिलर आहे. ज्याचा वापर जगभरात मोठ्या प्रमाणात केला जातो. ताप व वेदनेमध्ये वापरले जाते.
पण तुम्हाला माहिती आहे का पॅरासिटमॉल हे औषध आपल्या वेदना कशा कमी करते
तुम्ही कोणतेही दुखणे असूदे, किंवा ताप आलेला असूदे एक पॅरासिटमॉलची गोळी तुम्हाला तात्काळ आराम देते.
ही गोळी घेतल्यानंतर ती आपल्या पोटात लगेच विरघळते व रक्ताच्या माध्यमातून थेट मेंदूपर्यंत पोहचते.
मेंदूत पोहचल्यानंतर ही गोळी वेदना आणि ताप कंट्रोल करणारे केमीकल सिग्नल प्रोस्टाग्लॅंडिन prostaglandins ब्लॉक करते. यामुळे वेदना व ताप कमी होऊ लागतो
पॅरासिटमॉल थेट सूज किंवा इंफ्लेंमेशनला कमी करत नाही तर ब्रेनमधील टेम्परेचर कंट्रोल सिस्टीमवर काम करते त्यामुळे अंगदुखी, डोकेदूखी, व ताप यामध्ये उपयुक्त ठरते.
दुसरी गोष्ट म्हणजे आपण पोटात घेतलेल्या गोळीतील केमीकल पचवण्याचे काम लिव्हर करत असते. रेग्युरल डोसमध्ये हे काम लिवर सहज करते
पण ओव्हरडोस किंवा वारंवार घेतल्या जाणाऱ्या पॅरासिटमॉल गोळ्या लिव्हरवर प्रेशर टाकते. वारंवार असे होत राहिले तर यामुळे लिव्हरचे थेट नुकसान होते.
यामुळे पॅरासिटमॉल ठराविक वेळांच्या अंतराने घेतले पाहिजे तसेच. अल्कोहोलबरोबर तर अजिबात घेतले जाऊ नये त्यामुळे यकृतावर खूप प्रेशर येते
ही गोळी खाल्यानंतर फिवर कंट्रोल करणे, वेदनांचे सिग्नल कमी करणे, व गोळीचे मेटाबॉलिजम एकाचवेळी काम सुरु होते.